उत्तम कांबळे

इ. 12 वीच्या वर्गात असतांना काहीतरी वाचायचंय म्हणून कॉलेजच्या लायब्ररीत पुस्तक शोधत असतांना “वाट तुडवितांना” हे पुस्तक हाती लागलं. त्या पुस्तकामुळे पत्रकारितेशी ओळख झाली आणि पुस्तकांशी मैत्रीही! त्या पुस्तकाच्या लेखकाची सर्वीच पुस्तक मी वाचायला घेतली आणि त्यांच्या प्रत्येक पुस्तकात रममाण होऊन पहिल्याच बैठकीत पुस्तक संपवायची स्वतःशीच स्पर्धा सुरू व्हायची. त्यांची भन्नाट वाटणारी भाषणं, पुस्तकं, आणि अभ्यासू लिखाण वाचून मला त्यांच्या सारखच पत्रकार व्हायचंय ही माझी भूमिका ठाम व्हायची. मराठी साहित्यातल्या आवडत्या लेखकांपैकी एक लेखक म्हणजे सकाळ वृत्तपत्राचे माजी संपादक उत्तम कांबळे सर !

आज छात्रभारतीच्या शिबिरात त्यांच्याशी भेट झाली. “सध्या काय चाललंय तुझं?”, असा त्यांनी सवाल केला आणि सुरू झाला संवाद पत्रकारितेबद्दल!

यावेळी संविधानाची फ्रेम देत त्यांनी पत्रकारितेतील करिअर बद्दल शुभेच्छा दिल्या आणि “संविधानावर अभ्यास कर, पत्रकाराच्या जीवनात संविधानाच्या तत्वांची मोठी भूमिका असते. तुझ्या वेळेनुसार मला संविधानाचा अर्थ येऊन सांग!” अशी सूचना त्यांनी दिली.

Leave a Comment