उमेश देवगिरीकर

यापेक्षा अजून वेगळं काय हवं माणसाला! आपल्या कामाची दखल घेतली जातेय हीच एका कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. तुमच्या शब्दांनी मी भारावून गेलीय. तुमच्या सारखीच लोक आणि त्यांची माझ्या प्रतीची काळजी मला काम करायला नेहमीच प्रेरित करीत असतात. तुमच्या माझ्यासाठीच्या लिखाणाने नक्कीच माझी जबाबदारी अजून वाढली आहे. कितीही संकट आली तरी मी नेहमीच तटस्थ राहून लढण्याचा प्रयत्न करतेय आणि पुढे ही करत राहील!

खूप खूप धन्यवाद सर!


प्रिय छाया,

जिद्द, धाडसी निर्णय, कला कौशल्य , यश अपयश, कणखरपणा, चिकाटी, नेतृत्व, आणि खुप काही ….. समजत नाही तु जे काही करते आहेस ते स्वतः साठी करतेस की समाजासाठी….. पण जे काही करतेस ना खुप अनमोल आहे अगनीत आहे. तुझ ध्येय मला नाही माहिती पण तुझा रस्ता ज्या दिशेला  आहे ना तो खुप कठोर आहे असामान्य रंगाने आणि अनेक खाच खळगी भरून तुझ्या समोर आहे. खुप सावध राहायला हव  प्रत्येक पाउल विचार करून टाक  , कारण  काळजी वाटते मैत्री आहे म्हणून, काळजी वाटते मुलगी आहेस म्हणून . थोडा वेळ मनात काहुर ऊभ राहील.  पुढे लिहिण्यासाठी शब्द सुचेना……..पण तु धाडसी आहेस हुशार आहेस, नेतृत्व करण्यास आणि परीस्थीती शी दोन हात करण्याची ताकद आहे तुझ्यात, मगाशी मी म्हणालो मैत्री आहे, पण विचार केला कीती वेळा आपण भेटलो….. काही २ ते ३ तास  आणि आपल बोलण कीती झाले तर अगदी खुप कमी.. एवढय़ा कमी वेळेत एखाद्या व्यक्तीला अोळखणं तस कठीण… पण तुझ काम जिद्द यावरून आज समजल की तु असामान्य आहेस, माझ भाग्य आहे अशी व्यक्तीशी माझ मैत्री च नात आहे, आणि ते कायम राहील. आपले रस्ते वेगळे असू शकतात। पण गर्व नेहमी राहील.
मगाशी मी म्हणालो काळजी वाटते………. हो वाटते… वाटतही राहील…. हे जग तुला सहज कोणतेही काम पूर्णतः ला नेण्यासाठी समर्थ असणार नाही, तुझ्या वाटेत काटे पेरणीसाठी खुप बसलेत, पण तेच काटे बाजुला करणारे भेटतील च असे नाही.

सगळीकडे कपट कारस्थान करणारे बसलेत तशी खुप उदाहरणे तुझ्या समोर आहेत, माहीत आहेतच……… म्हणून. आज छात्रभारती शिबीरात मा. उत्तम कांबळे सरांनी तुला जी सुचना दिली त्या वरून तुझ्याशी बोलावे वाटल. भारतीय संविधान-  डॉ . बाबासाहेब आंबेडकर अनमोल रत्न परंतु आज देशात खुप बिकट परिस्थितीत आहे, संविधान हटवून मनुस्मृति लादण्याचा नीच प्रयत्न काही नीच वृत्तींकडुन केला जातोय, उघडया डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा काही तळवे चाटू लोकांनी देश गुलामगिरीत लोटून दिला आणि त्यातच देश प्रेम मानत आहेत,
पाटीभर असणाऱ्यांनी मात्र मुठ भर असणाऱ्यांची गुलामीत च सर्वस्व पाहील खुप चिड येते, तु असामान्य आहेस खुप पुढे जा आम्ही तुझ्या बरोबर आहोत काळजी घे.

तुला आणि तुझ्या कार्याला सलाम व खुप खुप शुभेच्छा

-उमेश देवगिरीकर
संभाजी ब्रिगेड पुणे

Leave a Comment