LGBT समुदायाबद्दल जाणून घ्यायचं कुतूहल मला नेहमीच होत!
पुण्यात पाहिल्यांदा तुळशी बागेत फिरत असतांना मी चुकून बुधवार पेठेत शिरली आणि तिथे कॉर्नर ला एक छोट्याशा स्टॉल मध्ये चिकन लॉलीपॉप तळताना बघून तिथेच खायला बसली. ऑर्डर दिली आणि आजू बाजूला बघितलं तर तो एरिया माझ्या लक्षात आला. तिथल्या काही व्याभिचारी नजरा मला टवकारून बघत होत्या. तिथून पटकन निघावं अस डोक्यात आलं आणि मी उठू लागली तेव्हा समोरच्या खुर्चीवर बसलेली एक ट्रान्सजेंडर माझी पळकी अवस्था बघून म्हणाली, खाली बस घाबरू नको, खाऊन जा! मला अजून aukward वाटू नये म्ह्णून तिचा ग्लास तिने side ला ठेवला आणि इतर पुरुषांना काही वेळ तिने आत येऊ दिले नाही आणि माझे ट्रान्सजेंडर विषयीचे एकतर्फी दृष्टिकोन बदलत गेले.

आणि आज दिशा पिंकी शेख, ज्या महाराष्ट्रातील ट्रान्सजेंडर सामाजिक कार्यकर्त्या, कवयित्री आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र राज्यासाठीच्या प्रवक्ते गटाच्या सदस्याही आहेत. त्यांची सर्वत्र ओळख सामाजिक चळवळीतील एक ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आणि कवयित्री म्हणून केली जाते, यांच्याशी छात्रभारतीच्या शिबिरात भेट झाली.
मुलींवरच्या बलात्काराला 7 वर्षे शिक्षा आणि ट्रान्सजेंडरच्या बलात्काराला शिक्षा फक्त 3 वर्षे ? सेक्स वर्कर महिलांच्या बलात्काराला आपण बलात्कार मानतो का ? बाई-बाई ची शत्रू नसते त्यांच्यात insecurity असल्यामुळे वाद होतात. खरतर बायका पुरुषांच्या दृष्टीकोनात चांगली बाई होण्यासाठी धडपडत असतात. हसत खेळत गर्भवती बाईच्या पुढे हाताची तर्जनी आणि मध्यमा ही दोन बोट नेत आपण विचारतो, पाहू तुला काय होईल, मुलगा की मुलगी ? पण आपण कधी तीन बोट पुढे केलीयेत का ? मुलगा किंवा मुलगी झाली तर आनंद होतो पण Intersexual child झालं तर बिघडतंय का ? घरात काम करणं म्हणजे मदत करणं नाही ती आपली जबाबदारी असते. भस्मासुर ला वरदान होत कि तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होईल आणि शेवटी तो स्वतःच्या डोक्यावर हाथ ठेवतो आणि भस्म होतो. मग माझं हात तुमच्या डोक्यावर ठेवल्याने तुमचं कल्याण होणार असेल तर माझा हाथ माझ्याच डोक्यावर ठेवल्याने माझा कल्याण का होत नाही ? अस दिशा ताई यावेळी म्हणाल्या.
आज तुला अशा कित्येक विषयांवर, संविधानावर, जाती-धर्मावर, स्त्री-पुरुष समानतेवर, तुझ्या अधिकारांबद्दल बोलतांना आणि एक जागृत ट्रान्सजेंडर सोबत संवाद साधतांना भारी वाटलं.
-छाया काविरे.