ह्या दंगली, जाळपोळ, कुपोषण, बेरोजगारी सारख्या विषयांना हात न घालता भोंग्यांच्या नावाने पेटलेल हे राजकारण, हे आप-आपसात भांडणारे राज्यकर्ते आणि ह्या सभोवतालच्या व्यभिचारी नजरा ! सभोवताली हे सगळं घडत बघताना जिन्याच्या पायऱ्यांवरुन उतरतांना वेगळंच दडपण येत कसलं तरी मोठं ओझं पाठीवर ठेवल्यासारखं वाटत। ही गर्दी, गोंधळ, रोज ऐकायला येणाऱ्या बलात्काराच्या घटना हे नकोय…. नकोय…. नकोय म्हणत मी जोरात किंचाळतेय पण माझ्या शेजारच्यालाही माझं किंचाळण ऐकू येत नाही। मग मनात दाटून येते एक वेगळीच निराशा …. आणि उदासीनतेच्या अंधकारात मी खोल डूबत जाते… डुबत जाते आणि डूबतच जाते….!